पीएनपी होली चाईल्डचा 100 टक्के निकाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यातील सीबीएसई दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.15) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील पीएनपी होली चाईल्ड वेश्वी सीबीएसई स्कूलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थी अमीर अली खान याने 90 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, मनस्व थळे याने 88.2 टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आणि विधी निगडे हिने 86 टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच, पीएनपी सायरस पुनावाला स्कूल नागावचा 93 टक्के निकाल लागला असून विद्यार्थिनी सिया राऊळ हिने 90.60 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर, पीएनपी वाय.एम.पी. सांबरी सीबीएसई स्कूलचा निकाल 86 टक्के लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी होली चाईल्ड वेश्वी शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल् वेणी, सायरस पुनावाला नागाव शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर आणि पीएनपी वायएमपी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दुबे यांच्यसाह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून भरभरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version