। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विराज म्हात्रे या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील अंतिम फेरीमध्ये धडक मारून पी.एन.पी. महाविद्यालयाला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी विराज याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला शाखाप्रमुख प्रा. नम्रता पाटील, मानव संसाधन विभागचे प्रा. विक्रांत वार्डे, डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, प्रा.तेजस म्हात्रे, प्रा.दिनेश पाटील व तसेच सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुद्धा विराजने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील मानसी नागावकर,गौरव राहुल, विराज म्हात्रे आणि वेदांत कंटक हे विद्यार्थीसुद्धा मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील झोनल राऊंडमध्ये पात्र ठरले होते यामध्येसुद्धा विराज म्हात्रे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक मिळवले होते.
याप्रसंगी विराजने मिळवलेल्या यशाबद्दल स्वतःचे मनोगत व्यक्तकरताना महाविद्यालयाने केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला आणि महाविद्यालयाचे असेच आशीर्वाद मिळत राहावेत अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली.