पीएनपी पावसाळी कबड्डी स्पर्धा संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र शासनाच्या किडा विभागातर्फ पीएनपी शैक्षणिक संकुल वेश्‍वी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 51 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून मुलींच्या गटात एकूण 21 संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत मुलांच्या गटात 14 वर्षे गटातील विजेते ना.ना. पाटील हायस्कूल आणि उपविजेते को.ए.सो. शाळा ठरली आहे. तर, 19 वर्षांखालील गटात विजेते पीएनपी कनिष्ट महाविद्यालय वेश्‍वी व उपविजेते ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाड ठरले आहेत. मुलींच्या 14 वर्षे वयोगटातील विजेते माध्यमिक शाळा सारळ व उपविजेते स.म. वडके हायस्कूल चोंढी, 17 वर्षे गटातील बा.ना. हायस्कुल आवास व उपविजेते ना.ना. पाटील हायस्कुल पोयनाड तर, 19 वर्ष गटातील विजेते ना.ना. पाटील हायस्कुल पोयनाड व उपविजेते पी.एन.पी. ज्यूजियर कॉलेज वेश्‍वी हे ठरले आहेत.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version