नृत्यस्पर्धेत पीएनपीची सान्वी प्रथम

| अलिबाग | प्रतिनिधी |

ठाणे कलानंद नृत्य संस्थेच्यावतीने ‌‘कलांजली उत्सव 2025′ या राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन ठाण्यातील दादा कोंडके ॲम्फीथिएटर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत कथक आणि भरतनाट्यम या प्रकारांत देशभरातील अनेक नृत्यांगनांनी सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील वेश्वीतील पीएनपी होली चाईल्ड सीबीएसईच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी सान्वी कार्वेकर हिने कनिष्ठ गटातील ‌‘ज्युनियर ड्युएट’ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशभरातील दिग्गज नृत्यांगनांमध्ये हा मान मिळवल्याने सान्वीचे शाळा, पालक आणि गुरूंकडून कौतुक होत आहे. या यशाबद्दल सान्वी कार्वेकरचे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version