हृदयद्रावक घटनेने अलिबाग हादरले
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पुरुषाने सोबत असलेल्या महिलेने दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे. शहरातील ब्लॉसम कॉटेजमध्ये हा प्रकार घडला आहे.
सदर महिला व पुरूष हे दोघेही कळंबोली येथील रहिवासी असून ते ११ मे पासून अलिबागमध्ये एक मुलगा व मुलीसह फिरण्याकरीत आले होते. १६ मे रोजी सकाळपासून त्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी तीनच्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता बेड वर दोन मुलांचे मृतदेह तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. दरम्यान यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने १ मे रोजी कळंबोली पोलिस ठाण्यात नोंदविली होती.