। अलिबाग । प्रतिनिधी ।
एका महिला पर्यटकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुरुळ येथील एका हॉटेलमध्ये घडली. मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याची चिठ्ठी मृत महिलेने लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेहा पोतदार असे या मृत पर्यटक महिलेचे नाव आहे. ही महिला मंगळवारी (दि. 01) अलिबागमध्ये फिरण्यास आली होती. कुरुळ येथील एका हॉटेलमध्ये ती राहिली. दरम्यान तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हॉटेलमधील व्यवस्थापनाशी संपर्क साधून खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा उघडला नाही. ही बाब अलिबाग पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यावर ती महिला मृत अवस्थेत दिसून आली. विषारी औषध खाल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.