पोलादपूर प्रचाराची रणधुमाळी जोरात

| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्या आहेत. तर उर्वरित सात ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (18 डिसेंबर) मतदान होऊ घातले आहे. उमरठमध्ये सरपंच आणि सदस्यपद रिक्त असतानाही ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर झाली आहे तर लोहारेमध्ये नऊ सदस्य बिनविरोध जाहिर झाले असताना फक्त सरपंच पदासाठी निवडणूक जाहिर झाली आहे. उर्वरित भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, कालवली, कापडे खुर्द या सहा ग्रामपंचायतींमध्येदेखील निवडणूक रंगतदार होणार असून सर्वत्र महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना, तसेच काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारदेखील भवितव्य आजमावित असल्याने या लढती रंगतदार होणार आहेत.

कालवली सरपंच पदासाठी शेकाप आणि शिंदे गटात चुरस आहे. शेकापचे योगेश महाडीक विरुद्ध किरण पवार अशी लढत आहेत. दिविल सरपंच पदासाठी दुहेरी लढत होत आहे. लोहारेमध्येही सरपंच पदासाठी थेट लढत आणि नऊ सदस्य बिनविरोध विजयी झालेले आहेत. भोगाव खुर्दमध्ये सरपंचपदाची चौरंगी लढत होत आहे. धामणदिवी येथे सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे. चांभारगणी बुद्रुकमध्ये तीन जागा बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. बोरघरमध्ये लढतीमध्ये महाविकास आघाडीसह शेकाप विरोधात शिंदे गटामुळे ग्रामपंचायत निवडणुक रंगतदार झाली आहे.

Exit mobile version