पोलादपूर: घरोघरी तिरंगा अभियानाची तयारी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील गावागावांत हर घर तिरंगा जावा यासाठी जय्यत तयारी प्रशासनाने सुरु केलेली आहे. अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ग्रामसेवक आणि मावळते सरपंच व सदस्य यांच्या माध्यमातून तिरंगा झेंडा वितरीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी तहसिलदार दीप्ती देसाई यांनी सांगितले.

तालुक्यात एकीकडे अतिवृष्टीचा ऑरेंज अर्लट हवामानखात्याच्या माध्यमातून जारी झाल्याने प्रशासनाकडून आपत्तीनिवारणकामी विशेष सतर्कता बाळगली जात आहे. दुसरीकडे, देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना कोणत्याही स्वरूपाचा निरूत्साह जाणविण्याची परिस्थिती दिसून येणार नाही,याची दक्षता देखील प्रशासन घेत असल्याचे देसाई यांनी सांगितले. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा अभियान वातावरणामध्ये चैतन्यनिर्मिती करणारे ठरणार आहे. तालुक्यातील नागरिकांना तिरंगा झेंडयाची विक्री सुरू झाली असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version