। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील बोकडविरा गावाजवळील सिडको बस स्टॉपजवळ असलेला पूल (साकव) कमकुवत झाल्याने अवजड वाहानांना बंदी करण्यात आला आहे. तरीही या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. या अवजड वाहानांवर उरण वाहतूक पोलीस शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहानांना लागू होणार नाही. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, उपनिरीक्षक संजय पवार सहाय्यक, उपनिरीक्षक संजय जाधव, नाईक विशाल भिसे, नाईक गोलवड, शिपाई घोडके आदींनी अवजड वाहानांवर कारवाई केली.