| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरासह तुर्भे व सीबीडी परिसरातून मोटारसायकली चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
पनवेल परिसरातून तीन मोटारसायकली तसेच तुर्भे व सीबीडी परिसरातून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विनोद लभडे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा अमोल डोईफोडे, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोशि चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अजयलाल कौल (30), रा. करंजाडे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख पाच हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.