| खरोशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा पोलीस अंतर्गत खालापूर पोलीस ठाणे व खालापूर तालुका पोलीस पाटील संघटना यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या संकल्पनेतून समाजासाठी काहीतरी करावं या हेतूने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 30 जानेवारी रोजी पेण एज्युकेशन सोसायटी संचलित नाना टिळक प्राथमिक विद्यालय वावोशी येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक वावोशी अलोक खीसमतराव, वावोशी गावचे पोलीस पाटील मनीष हातनोलकर, वावोशीच्या सरपंच अश्विनी उदय शहासणे, ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे व रिया वालम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल यादव तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष वैशंपायन आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या धनाजी घरत यांनी केले. तसेच, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका मानसी केदारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक सुनील पवार, विद्या शेट्ये, आरती पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.