पोलीस मित्र संघटनेचा उपोषणाचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयातील सर्वर डाऊन असल्याने वेब साईट चालत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना वेळेत सर्व प्रकारचे दाखले मिळत नसलेल्या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस मित्र संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी शुक्रवारी दि.22 मेपासून कर्जत प्रशासकीय भवन येथे उपोषण सुरू केले आहे.

पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी शुक्रवारपासून कर्जत प्रशासकीय भवन बाहेर उपोषणाल सुरुवात केली आहे. सरकारी सर्वर डाऊन असल्याने सातत्याने कामे खोळंबून राहतात. त्यात तालुक्यातील हजारो विद्यार्थी आणि ईतर नागरीकांना साईट चालत नसल्यामुळे सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने सर्व प्रकारचे दाखले ऑफलाईन देण्याची व्येवस्था करावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. सरकारी वेब साईट चालत नसल्यामुळे वेळेत दाखले मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न दाखले दाखल केल्याल्या पावतीवर सर्व विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन उत्पन्नाचे दाखले दाखल करण्यास दोन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या बेमुदत साखळी उपोषणाची दखल घेऊन मागण्या पूर्ण न केल्यास कोणत्याही क्षणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्ते रमेश कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version