। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाबतीत निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत पोलीस मित्र संघटनेने साखळी उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली असून, पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
1 एप्रिलपासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. तहसीलदार डॉ धनंजय जाधव,कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि पाटबंधारे विभगाचे उप अभियंता अमित पारधे यांनी उपोषण स्थळी रमेश कदम यांची भेट घेतली. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सातत्याने शासकीय अधिकार्यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र, सर्व प्रश्नांवर समाधान होत नसल्याने कर्जत येथे सुरू असलेले साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात आले होते. शेवटी 7 एप्रिल रोजी कर्जत तहसीलदारांच्या पुढाकाराने सर्व शासकीय कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात असून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.