। पुणे । प्रतिनिधी ।
देहू-आळंदी रोडवरील स्क्रॅप गोदामाला मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील देहू-आळंदी रोडवर असलेल्या एका स्क्रॅप गोदामात मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे आग जास्त प्रमाणात वाढत गेली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तब्बल तीन ते चार तासांनी आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचे कारण अस्पष्ट आहे.