पोलादपूरमध्ये पोलिसांचा लाँगमार्च

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
शहरातील महाबळेश्‍वर रस्ता आणि बाजारपेठेमधून महाड उपविभागीय पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर लाँगमार्चचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि चार उपनिरिक्षक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलादपूर शहरामध्ये गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी पोलीस जीपमधून जाहिर आवाहन करण्यात आले. यावेळी पोलादपूर येथील छ.शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळयापासून महाबळेश्‍वर रस्ता व शिवाजीनगरपासून पोलादपूर शहरातील बाजारपेठ असा लाँगमार्चचा मार्ग होता. पाच पोलीस जीपदेखील यामध्ये सहभागी झाल्याने पोलादपूर शहरातील नागरिकांमध्ये या लाँगमार्चचे विशेष आकर्षण निर्माण झाले असून या आवाहनानुसार आगामी गणेशोत्सवकाळामध्ये कोणत्याही प्रकारे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला प्रतिबंध करण्यासंदर्भात नागरिक सतर्क राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Exit mobile version