। नागोठणे । वार्ताहर ।
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या 20 तारखेला राज्यात सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. नागोठणे शहरात निवडणूक काळात तसेच मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचनेनुसार व पोलिस उपअधीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे शहरातून पोलिसांचा रविवारी (दि.17) सकाळी 10.30 वाजेपासून पथ संचलन करण्यात आले. यावेळी या पथ संचलनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक पवरा, 11 पोलिस कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 50 सुरक्षा रक्षक या पथ संचलनात सहभागी झाले होते.