निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचा रूटमार्च

। माणगाव । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगांव पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. यावेळी माणगांव पोलिसांकडून बुधवारी (दि.6) माणगाव बाजारपेठ ते बस स्टँड, निजामपूर, इंदापूर तसेच माणगांव पोलीस ठाणे हद्दीत रूटमार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, नरेंद्र बेलदार यांच्यासह सशस्त्र सीमा बल आसामचे 8 अधिकारी, 44 जवान, तसेच दंगल नियंत्रण पथक माणगावचे 28 अंमलदार व माणगाव पोलीस ठाण्याचे 4 अधिकार, 15 अंमलदार यांनी रूटमार्चमध्ये सहभाग घेतला होता.

Exit mobile version