आदिवासींचा रस्ता चिखलात
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या पायथ्याशी गेले अनेक वर्षांपासून आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत. मात्र, स्वातंत्र्यकाळापासून या आदिवासी वाड्या अद्यापही रस्त्यापासून वंचित आहेत. गेले अनेक वर्षांपासून हे आदिवासी बांधव आपल्या श्रमदानातून रस्ता बनवत असतात. मात्र, हा रस्ता दिवाळीनंतर बनवला जातो. या रस्त्याला महेश विरले यांनी जेसीपी लावून माती टाकण्यात आली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस असल्यामुळे या धनगर वाडा, बेकरेवाडी, अस्सल वाडी, नाण्याचा माळ या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या आदिवासी बांधवांना स्वतःची वाहने नेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी वाड्यांना स्वातंत्र्य काळापासून रस्ता नाही. मात्र, हे आदिवासी वाडीतील लोक आपल्या श्रमदानातून रस्ता करत असतात. मात्र, यावर्षी हा रस्ता सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र, या रस्त्यावर दिवाळीनंतर मातीचा भराव टाकण्यात आला त्यानंतर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली मुसळधार पाऊस पडल्याने या रस्त्याची दूर अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकी स्वार व पायी जाणारे आदिवासी वाडीतील लोक यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने या ठिकाणी वाहन चालवणे देखील अवघड जात आहे. समजा या आदिवासी वाडीमध्ये एखादी मोठी घटना घडली तर या आदिवासी वाडीतील लोकांना खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल.
कारण या रस्त्याला कुठल्या प्रकारे वाहन जात नसल्याने या ठिकाणच्या रस्त्याची दूर अवस्था पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर जेव्हापासून माती टाकण्यात आली, त्यानंतर येथील आदिवासी लोकांचे नाहक हाल आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र, माती टाकल्यानंतर कुठलाही राजकीय नेता या रस्त्याकडे डोकावला आलेला नाही. आज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी राहणारे आदिवासी लोक आपल्या स्वतःची दुचाकी घेऊन आपला प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात टाकून हा प्रवास करावा लागत आहे. या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता हा एकूण पाच किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यावर आदिवासी बांधवांनी श्रमदानातून मातीचा भराव टाकण्यात आला होता, परंतु, सातत्याने पडणाऱ्या पावसाने चिखल झाला आहे. त्यामुळे पायी चालणेसुद्धा मुश्किल झाले आहे.







