ठेकदारावर कारवाईची मागणी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून तळोजा गावातील तलाव सुशोभिकरणाचे काम सुरु केले. मात्र, ठेकेदाराने सदर कामे ही अत्यंत खराब केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी केला आहे. या कामाची पाहणी करून चौकशी करावी व तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे दिले आहे.
कोट्यवधी रुपये निधी खर्चून जर का असे काम होत असेल तर नक्कीच यामध्ये गडबड असावी, असा समज नागरिकांचा झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबधित अधिकारी व ठेकेदार आणि सामील असलेले लोकांवर कारवाई करावी अन्यथा लवकरच तळोजा येथे जनआंदोलन उभारण्यात येईल याला सर्व प्रशासन जबाबदार असेल, असेही शहाबाज पटेल म्हटले आहे.