कर्मचार्‍यांसाठी टपाली मतदानाची सोय

| ठाणे | प्रतिनिधी |

निवडणुकीच्या कामावर नेमलेले ठाणे जिल्ह्यातील 32 हजार अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदानाच्या कामासाठी अधिकारी याचं मत वाया जाऊ नये, म्हणून सरकारनं निवडणूक आयोगाचं मदतीनं कर्मचार्‍यांसाठी केलेली ही विशेष व्यवस्थेचा फायदा घेऊन तीस हजार कर्मचार्‍यांना मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशभरात व्यवस्था करण्यात आली असून, मतदानाचा टक्का यामुळं वाढण्यास मदत होणार आहे.

Exit mobile version