| रत्नागिरी । वार्ताहर ।
मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरीसरात उपलब्ध आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेतील प्रथम व द्वितीय फेरी पार पडल्यानंतर शिल्लक असणार्या जागांसाठी स्पॉट डमीशन सुरू आहे. प्रवेशासाठी ईच्छुक विद्यार्थी मुळ कागदपत्रे घेउन उपपरिसर कार्यालयात आल्यावर प्रवेश दिला जाईल. मर्यादित जागा शिल्लक असल्याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
एमएससी रसायनशास्त्र विभागासाठी एकूण 60 जागा असून ऑरगॅनिक, नेलेटीकल, फिजीकल तसेच इनऑरगॅनीक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशन मध्ये प्रवेश दिला जातो. झूलॉजी विभागातमध्ये ओशनोग्राफी स्पेशलायझेशन साठी एकूण 25 जागा असून सदर अभ्यासक्रम विषेशतः सामुद्रिक अभ्यास व फिशींग व फिश प्रोसेसिंग कौशल्याधारित आहे त्यामुळे संबंधित उद्योगातील रोजगार तसेच संशोधन संधी उपलब्ध होतात.
पर्यावरणशास्त्र विभाग गेली 20 वर्ष रत्नागिरी उपपरिसरात सुरू असुन प्रवेश क्षमता 20 विद्यार्थी आहे.तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश निश्चित करावा असं आवाहन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केला आहे तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी 08550955999, 9619894543 आणि 09665334103 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे