। कोळा । वार्ताहर ।
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले एकाच मतदारसंघातून माजी मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांना केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी शेकाप ज्येष्ठ नेते सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विलासराव देशमुख यांनी केली आहे.
देशातील गिनीज बुक नोंद अकरा वेळा विधानसभा सदस्य म्हणून नोंद झाली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सिटीजन ऑफ इंडिया पुरस्काराने गौरव करण्यात आला असे अनेक गुण गौरव पुरस्कार त्यांना मिळाले आहेत साधी राहणी उच्च विचारसरणी श्रमजीवी जनतेची बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जपली यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा अशी सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे असे विलासराव देशमुख यांनी सांगितले.