दोघांना मिळणार दृष्टी
| अलिबाग| विशेष प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या एका व्यक्तीचे मंगळवारी दुपारी 2.35 च्या दरम्यान मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. एप्रिल 2022 पासून हे चौदावे नेत्रदान यशस्वी झाले असून आजच्या नेत्रदानामुळे दोन गरजूंना दृष्टी मिळणार आहे.
आरोग्य सेवा मुंबई, मंडळ ठाणे उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी स्वतः नेत्रसंकलनाची यशस्वी प्रक्रिया केली. या कार्यात मालती मोकल, सरिता राऊत, निकिता नागावकर, पायल कदम, दर्शना म्हात्रे स्वाती मयेकर, हिराचंद्र म्हात्रे, राजेंद्र वेळे, अमोल केकान यांच्यासह आदींचे सहकार्य लाभले.