आदई सर्कल परिसरात खड्डे

| पनवेल | वार्ताहर |

सुकापुरकडून नवीन पनवेलकडे जाताना आदई सर्कल परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनांचा वेग मंदावतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सुकापुर मार्गे नवीन पनवेलच्या दिशेने जाताना महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या आदई सर्कलजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी एका बाजूला सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला आहे. मात्र, तो रस्ता उंचवट्यावर असून डांबरीकरण असलेला रस्ता खाली आहे. त्यामुळे वाहनेवर खाली होत आहेत. नेरे धोधाणी, आकुर्ली, हरिग्राम, मोरबे परिसरातून हजारोंच्या संख्येने वाहने पनवेलच्या दिशेने जात असतात. त्यांना या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असून मोठ्या प्रमाणात चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच, या खड्ड्यांमध्ये वाहने आपटून त्यांचे नुकसान होत असलेल्या तक्रारीत वाढ होत आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेने हे खड्डे बुजवून प्रवाशांची या खड्ड्यातून मुक्तता करावी, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version