| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात कुंभार समाजाचा परंपरागत व्यवसाय संकटात सापडला आहे. तुपगांव, चौक, चिंचवली या कुंभारवाडयांमध्ये 30पेक्षा जास्त कुटूंब आज वास्तव्यास आहेत. येथील कुंभारवाडयात मडकी विक्री करण्यासाठी बांबुच्या काठयांपासून बनवलेल्या मोठया हार्यामध्ये मडकी घेऊन काही अंतर चालून मडक्यांची विक्री केली जात होती. सध्या ही मातीची मडकी व मातीची विविध प्रकारची भांडी कमी झाल्याचे पहावयास मिळते.
पूर्वी दूध मडक्यात गरम केले जात असे. तसेच दही मडक्यात लावले जात असे. त्यामुळे या दुधाला व दहयाला वेगळी चव येत होती. त्यामुळे ते आवडीने खाल्ले जात असे. आता ही भांडी दुर झाली असून या मातीच्या भांडयांची जागा धातूच्या भांडयानी घेतली आहे. त्यामुळे मातीच्या भाडयांची मागणी कमी झाली असून या मातीच्या भाडयांची मागणी कमी झाली आहे. म्हणून कुंभारसमाज नोकरी, गवंडीकाम, वेल्डींग, मजूरी अशी कामे करुन आपली उपजिविका भागवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तूपगाव येथील दत्ता कुंभार यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवला असून लग्नाचे कडे, मातीची चुल व इतर कार्याला लागणार्या मातीच्या वस्तु निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत. परंतु परंपरेला मडक्यांमुळे आज काही ठिकाणीच तुरलक प्रमाणात व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या व्यवसायाला उतरते दिवस आले असून कुंभार समाजाचा हा पारंपारीक व्यवसाय संकटात सापडल्याचे कुंभारबांधव सांगत आहेत.