| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर परिसरात गेले दोन-तीन दिवस ,दिवस- रात्र विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे येथील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. किराणा दुकानदार, थंडपेयवाले, परिसरातील सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, भात गिरण्या, पिठाच्या गिरण्या त्याचबरोबर लग्न समारंभावर देखील विजेच्या लपंडावाचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महावितरण कंपनीचे उरणचे मुख्य अभियंता श्री सोनावणे यांच्याशी मातृछाया फाउंडेशनच्या रायगड जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता अभियंता सोनावणे यांनी पावसाळा जवळ आल्यामुळे विद्युत खांबावरील वीज वाहिन्या ताणून घेणे, तसेच ज्या ठिकाणी विजेचा धोका संभवत असेल अशा ठिकाणीची विजेची दुरुस्ती करून घेणे त्याचबरोबर अन्य काही विजेच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवावा लागत असल्याचे सांगितले.