क्रीडामंत्र्यांकडून कौतुकाची थाप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा युवा बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंदने अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुद्धीबळपटूंचा पराभव केला. तर अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला रॅपिड फेरीपर्यंत झुंजवले. देशभरातून 18 वर्षाच्या प्रग्नानंदवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील प्रज्ञानंदची पाठ थोपटली. प्रज्ञानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील प्रग्नानंदचा गौरव केला.
या गौरवानंतर प्रज्ञानंद एएनआयशी प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘आम्हाला इतका पाठिंबा मिळतोय हे पाहून खूप आनंद झाला आहे. यामुळे अजून कष्ट करून चांगली कामगिरी देशाला कीर्ती मिळवून देण्यासाठी प्रेरणा मिळते.’ दरम्यान, प्रज्ञानंदचा गौरव करताना केंद्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘मी त्याचे अभिनंदन केले. त्याने भारताचा गौरव वाढवला. अवघ्या 16 व्या वर्षी जे इतर कोणाला जमणार नाही, ते त्याने करून दाखवलं. त्याने अनेक युवकांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रेरितदेखील केलं आहे. बुद्धिबळाची सुरूवात भारतात झाली, मात्र भारतात चेस ऑलिम्पियाड आयोजित करण्यासाठी शेकडो वर्षे लागली. आम्ही ते यशस्वीरित्या आयोजित करून दाखवलं.’प्रज्ञानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेतली होती. त्यावेळी ट्विटरवरून त्याने पंतप्रधानांचे आभार देखील मानले होते. त्याने ट्विट केले की, ‘पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची संधी मिळणे हा खूप मोठा गौरव आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार