प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी

| उरण | प्रतिनिधी |

म्हैसूर विद्यापीठ येथे दि. 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आंतरविद्यापीठ साउथ वेस्ट झोन युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश म्हात्रे याने उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकवले आहे. या महोत्सवात प्रथमेशने मातीकाम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला असून पोस्टर मेकिंग स्पर्धेत चतुर्थ स्थान मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई विद्यापीठाने या महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद मिळवले, त्यात प्रथमेशचे योगदान मोलाचे ठरले. या अभूतपूर्व यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे. पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, कॉलेज विकास समितीचे भावना घाणेकर, कॉलेज विकास समितीचे सदस्य व माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष सुधीर घरत, प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व सदस्यांनी प्रथमेशचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Exit mobile version