माणगांवचा शिवशंभो संघ ठरला अव्वल
| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील कोतवाल गावामधील कालकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्था कोतवाल बुद्रुकच्या वतीने आ. प्रवीण दरेकर चषक 2024 क्रिकेट स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवशंभो माणगाव संघ अव्वल ठरला, तर पोलादपूर तालुक्यातील सवाद संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. तालुक्यातील करंजे संघाने तिसर्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. याप्रसंगी आ.दरेकर यांनी महाड-पोलादपूरमधील खेळाडूंसाठी नेटवर सिझन बॉलचे मुंबईस्तरावरील ट्रेनिंग सेंटर सुरू करू, असे आश्वासन दिले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळ्या प्रसंगी प्रकाश दरेकर, बिपीन म्हामुणकर, मनोज भागवत, किशोर जाधव, कृष्णकांत दरेकर, आयोजक राजेश सकपाळ, स्थानिक भाजपनेते प्रसन्ना पालांडे, राजाभाऊ दिक्षित, महाड अध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर नगरपंचायत सभापती अंकिता निकम जांभळेकर तसेच, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे निलेश कोळसकर, अन्य मान्यवर उपस्थित होते.