कोलाड परिसरात मान्सून पूर्व मशागतीची कामे पूर्ण

| कोलाड | प्रतिनिधी |

पाऊस 25 मे नंतर पडेल या अंदाजामुळे कोलाड परिसरातील बळीराजाने शेतीची पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. परंतु, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे बळीराजा पाऊसाची वाट पाहत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

दरवर्षी 25 मे नंतर रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यानंतर भातपेरणी केली जाते. परंतु, पाऊस लांबणीवर गेल्यानंतर मृग नक्षत्र सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही, यामुळे भात पेरणी करायची कि नाही या संभ्रमात शेतकरी वर्ग पडला आहे. पुर्व मशागत कामे म्हणजे पेरणी किंवा लावणी करण्याच्यापूर्वी शेतीची जमीन तयार करण्यासाठी करायची कामे म्हणजे पुर्व मशागत होय. यामुळे माती भुसभूशीत होते. यामध्ये शेत नांगरणे, ढेकले फोडणे, सेंद्रिय खत मिसळणे, जमीन सपाट कारणे या कामाचा समावेश होतो. यामुळे जमिनीची धूप थांबणे, हवा पाणी खेळती राहणे, तण व किडीचा नायनाट होणे यासाठी पुर्व मशागतीची कामे केली जातात. शेतातील आधीच्या पिकाचे अवशेष (धसकटे), झाडे -झुडपे, दगड गोटे उचलून शेत स्वच्छ केले जाते. यानंतर नांगरणी करून जमीन भुसभूशीत केली जाते. यानंतर कुळवाच्या सह्याने ढेकळे फोडली जातात. तसेच, या मातीत शेणखत व कणपोस्ट खत सामान पद्धतीत मिसळून ते मातीत चांगल्या पद्धतीने मिसलेले जाते. पिकाच्या प्रमाणात वाफे तयार केले जातात. ही सर्व मशागतीची काम पूर्ण करून शेतकरी वर्ग पेरणीसाठी सज्ज झाला असून, यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

Exit mobile version