| उरण | वार्ताहर |
पावसाळा जसा जवळ येऊ लागला तशी शेतकऱ्यांची शेतीची मशागत करण्यासाठी लगबग सूरू झाली आहे. शेताचे बांध व्यवस्थित करणे, वाफ्यांसाठी राब भाजणे, शेतातील पालापाचोळा साफ करणे इत्यादी प्रकारची कामे उरकण्यात शेतकरी सध्या गुंतले आहेत. अशातच या हंगामात पुन्हा एकदा या काळ्या मातीतून तो सोने उगविण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन दिवसांपासून या भागात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने काही शेतकऱ्यांनी खाडी पट्ट्यातील भात पेरणीची आणि मशागतीची कामे सुरू केली आहेत. बेभरवशी हवामान, महागडे बियाणे, महागडी खते आणि औषधे याची कोणतीही तमा न बाळगता यावर्षी मागिल वर्षीपेक्षा जास्त भाताचे उत्पादन घ्यायचे, हे ध्येय उराशी बाळगून येथिल शेतकऱ्यांनी आपल्या खाऱ्या शेतामध्ये भाताची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे.