| पनवेल | वार्ताहर |
श्रीवर्धन ते मुंबई या एसटी बसच्या प्रवासात एका घरकाम करणार्या प्रवासी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी झाले. मुंबई येथील कुलाबा येथे राहणारी 36 वर्षीय महिला मुंबईला एसटी बसमधून प्रवास करत होत्या. पनवेल बस आगारात बस थांबल्यावर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी झाल्याचे समजले. या घटनेनंतर पीडित महिलेने एक लाख रुपयांचे गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवली.