राष्ट्रीय पल्स पोलिओची जय्यत तयारी

| सुतारवाडी | वार्ताहर |

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम रविवारी (दि. 3) राबविली जाणार असून आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 69 बुथ आहेत. राष्ट्रीय पल्स पोलिओची माहिती तळागाळातील व्यक्तींना व्हावी यासाठी आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक, सेविका, आशा, मदतनीस, अंगणवाडी सेविका कर्मचारी गावोगावी फिरून जनजागृती करून प्रचार करत आहेत. त्यांच्याबरोबर वाहन चालक ही मेहनत घेत आहेत.

Exit mobile version