शेकापच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचा जोरदार तयारी

| मुंबई | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाची जोरदार तयारी पक्षाच्यावतीने सुरु आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथे 2 ऑगस्टला होणार्‍या वर्धापनदिन सोहळ्यासाठी दिल्लीतील आपचे नेते, मंत्री गोपाळ राय, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा.राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी 25 हजार कार्यकर्ते जमविण्याचा निर्धार रायगड जिल्हा शेकापने केला आहे. या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यास राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित रहावे आणि 3 ऑगस्ट रोजी आपआपल्या जिल्हा, तालुका, विभाग, गाव पातळीवर अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आवाहन कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Exit mobile version