| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजताना दिसणार असल्याने अनेक फार्महाऊसमध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करीत जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या वर्षी 31 डिसेंबर रोजी बुधवार आल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर पनवेल परिसरात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून वालाच्या शेंगाचा बहर उशिराने येणार आहे. त्यामुळे पोपटीची चव फार थोड्या प्रमाणावर चाखता येणार आहे. तसेच, गावठी कोंबड्यांची मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कोंबडीची किंमत 400 ते 500 रुपये आणि कोंबड्याची किंमत 800 रुपये आणि त्यापुढे आहे. त्याचबरोबर पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाऊस आहेत. दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या फार्महाऊसवर पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे यंदाही मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणेसह इतर जिल्ह्यांतील पर्यटकांनी पनवेल परिसरातील फार्महाऊसमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्याची योजना आखली असून त्यातील बहूतांश पर्यटकांनी आगाऊ बुकींग केलेली आहे. त्यामुळे पनवेलमधील फार्महाऊस आता हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या स्वागतासाठी पनवेलमधील फार्महाऊस मालक-चालक सज्ज झाले आहेत. ते शासकीय नियमांचे पालन करीत जय्यत तयारी देखील सुरू केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात ग्राहक राज रिसॉर्टमध्ये येणार असल्याने सर्व शासकीय नियमांचे पालन करून येथे नियोजन करण्यात आल्याने त्यांना एक वेगळा अनुभव यावर्षी सुद्धा नक्कीच मिळेल.
– संतोष उरणकर, मालक, राज रिसॉर्ट







