। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत असून राजभवनात नव्या दरबार हॉलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे उपस्थित आहेत.
राजभवान जुन्या दरबार हॉलच्या जागीच नवीन दरबार हॉल बांधण्यात आला आहे. जुन्या दरबार हॉलच्या तुलनेत नव्या हॉलमध्ये जास्त आसनक्षमता आहे. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ठ्ये अबाधित ठेवून सभागॉहाला बाल्कनी आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. २०१९ मध्ये सुरु झालेलं काम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झालं आहे.