वाढदिवशी केला वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार, दि. 6 जुलै या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सर्वसामान्यपणे नातलगांना, मित्रांना पार्टी देऊन, केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. परंतु, लबडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आपल्या सहकार्यांसह श्रीवर्धन येथील मठाचा गावंड, समुद्र किनारा येथे शिवण, करंज, रिठा इ. जातीच्या सुमारे 200 रोपांचे वृक्षारोपण केले. माझी वसुंधरा अंतर्गत आपल्या सृष्टीचे संवर्धन करण्यासाठी घेण्यात येणार्या शपथेची श्री. लबडे यांनी खर्या अर्थाने अंमलबजावणी करुन एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शहरवासियांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.