सावित्री माध्यमिक विद्यालयाला प्रिंटर भेट

। आंबेत । वार्ताहर ।
भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. एकीकडे शासनाचे निर्बंध लागू असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा दिन साजरा करण्यात आला. आंबेत ग्रामपंचायत हद्दीत देखील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, बँक, डाकघर, पोलीस चेक पोस्ट अशा विविध ठिकाणी हा दिन पार पडला. यावेळी सावित्री माध्यमिक विद्यालयात मुंबई हायकोर्टचे नामांकित वकील तसेच अनेक मुख्य पदांवर काम करीत असलेले अभिषेक सिंग यांच्याकडून शाळेला प्रिंटर भेट देण्यात आले. यामुळे शाळेला मदतीचा हातभार लागला आहे. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सरपंच, उपसरपंच, सदस्य सह परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version