प्रा.भाऊसाहेब सांगळे सेवानिवृत्त

| हमरापूर | वार्ताहर |
न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज जोहेचे प्राचार्य भाऊसाहेब सांगळे हे सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते पुणेरी टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
    

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आजीव सेवक प्रकाश हाके, संस्थेचे निरीक्षक संजय महाजन, निरीक्षक सुरेश बेडगे, रायगड निरीक्षक सुरेश पाटील, स्कुल कमिटी अध्यक्ष अशोक मोकल, पेण कॉलेजचे प्राचार्य दुधाळे, प्राचार्य बि.एन.सांगळे, साई कॉलेज प्राचार्य आर.के.पाटील, गडब निरीक्षक टी.बी.मोकल, सरपंच जयवंती पाटील, जोहे शाखेचे सदस्य डॉ.अनंत पाटील, काशिनाथ पाटील, रामदास पाटील, नितीन मोकल, देवा पेरवी, गोपीनाथ मोकल, शंकर मोकल, लव्हेन्द्र मोकल, लहू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version