| खरोशी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (बालभारती) येथे प्रा. राजेंद्र जाधव याची इतिहास अभ्यास मंडळ समिती सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.
प्रा. राजेंद्र जाधव हे रायगड जिल्ह्यातील पेण येथे एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे येथे इतिहास अभ्यास मंडळ समितीवर नियुक्ती झाल्याने पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, अॅड. बापूसाहेब नेने संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य सहकारी, मित्र परिवाराकडून व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रा.जाधव यांची एनसीईआरटी भोपाळ, सीसीआरटी (सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्र दिल्ली येथे 21 दिवस) येथील प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. तसेच एससीईआरटीच्या प्रश्न पेढी निर्मिती व आनंददायी शनिवार उपक्रमासाठी राज्यस्तरीयस सुलभक म्हणून कार्य केले आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे येथे विषय समिती सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. तसेच महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व छत्रपती सेना महाराष्ट्रच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक परिषद महाराष्ट्राच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.






