| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीमार्फत विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे यांची केंद्रशासन पुरस्कृत स्वच्छ भारत अंतर्गत ब्रँड अँबॅसिटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक ढेपे यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र नगरपंचायतीतर्फे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आपल्या सहीनिशी दिले आहे. विवेक ढेपे यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
माणगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या विवा कॉलेजचे विवेक ढेपे हे प्राचार्य आहेत. या कॉलजमध्ये रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून 370 हून अधिक विद्ययार्थी विविध प्रमाणपत्र कोर्सेसच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण या कॉलजमध्ये दिले जाते. केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात विशेष असा पुढाकार हा कॉलेज घेत असून दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत शासनातर्फे राबविण्यात येणार्या स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमातही विवा कॉलजने सक्रिय सहभाग घेऊन पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ स्वच्छता रॅली काढून केली.