महावितरणतर्फे अलिबाग, रोह्यात कार्यक्रम

| मुंबई | प्रतिनिधी |
 भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागांतर्गत ङ्गउज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्यफ पॉवर 2047 या अभिनव संकल्पनेअंतर्गत महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत  या महोत्सवाचे आयोजन दि. 28 जुलै रोजी 3 वाजता, द विजय को. ऑप. हौ. सोसायटी हॉल, एसएल मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड जनक्शन, मुलुंड येथे तर  29 जुलै रोजी 6 वाजता महर्षि, विठ्ठल रामजी शिंदे शाळा, ईश्‍वर नगर एलबीएस मार्ग, भांडूप पश्‍चिम येथे आयोजित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात  28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जेष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे, तसेच   29 जुलै रोजी अलिबाग येथील डीपीडीसी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमात महावितरण कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता  धनंजय औढेंकर यांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version