अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2020-2021 पदोन्नतीच्या विचारक्षेत्रातील पोलीस अंमलदार यांची अंतिम निवडसूची प्रसिद्ध झाली आहे. रायगड जिल्हा पोलीस दलातील एकूण 220 पोलीस हवालदार यांना सहा.पोलीस उपनिरीक्षक पदावर, एकूण 90 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर तर एकूण 297 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक .अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पदोन्नतीचे बॅच लावून त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.