तृतीयपंथियांकडून वेश्याव्यवसाय

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणच्या पोलीस हद्दीसह इतर विविध सार्वजनिक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तृतीयपंथीयांकडून बिनधास्तपणे अश्‍लील वर्तन करून वेश्याव्यवसायासारखे अनैतिक प्रकार केले जात असल्याने याबाबत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी तृतीयपंथी हे अश्‍लील कृत्य व वेश्याव्यवसाय करीत असताना मिळून येत आहेत. त्यामध्ये कळंबोली स्टील मार्केट परिसर जेथे ट्रक उभे केले जातात त्या ठिकाणी, आसुडगाव परिसर, सायन-पनवेल महामार्ग, खांदा वसाहत, खारघर परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेलपाडा हायवे, कळंबोली हायवे व ट्रक टर्मिनल येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे सायंकाळनंतर ते रात्री उशिरापर्यंत तृतीयपंथी लोक सार्वजनिक ठिकाणी अतिशय बीभत्सपणे बिनधास्त अश्‍लील वर्तन, वेश्याव्यवसायसारखे अनैतिक प्रकार करत असतात. या प्रकारांमुळे त्या परिसराची नाहक बदनामी होत आहे. सदर तृतीयपंथीयांकडून चालणार्‍या अनैतिक कृत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version