कांदळवनाचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी

| नागोठणे । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्याला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला असून सदर किनारा परिसरात अंदाजे 3000 हेक्टर क्षेत्रावर कांदळवने अस्तित्वात आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने ही कांदळवने अतिशय महत्त्वाची असून त्यांना पुरेसे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कांदळवन प्रतिष्ठान, वानिकीच्या प्रकल्प सहयोगी निमिशा नारकर यांनी शेठ श्री ओटरमल शेशमल परमार कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरींग येथे केले.

भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल, फार्मसी महाविद्यालय तसेच डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कांदळवन प्रतिष्ठान वानिकीच्या प्रकल्प सहयोगी निमिशा नारकर व प्रथमेश बारे यांनी विद्यार्थ्यांना कांदळवनाचे महत्त्व पटवून दिले व कांदळवनाच्या संरक्षणासाठी काय उपाय करावेत याविषयी मार्गदर्शन केले.

कांदळवनांमुळे किनारी प्रदेशाचे संरक्षण होते, तसेच मासे व खेकडे यांना संरक्षण मिळून त्यांचे उत्पादन वाढते. पर्यटनाची साधने उपलब्ध होतात व किनारी भागातील जैवविविधता टिकून राहते, असे कांदळवनाचे महत्त्व पटवून त्यांचे संरक्षण केले गेले नाही तर भावी पिढ्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा धोकावजा इशाराच दोन्ही वक्त्यांनी दिला. याप्रसंगी वनाधिकारी समिर शिंदे व अनिकेत पेणूरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version