| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
डोंगरी ते राजपूरी या रस्त्यावरील संरक्षक कठडा व भिंत बांधण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे. जयंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हा यांना याबाबतचे प्रश्न उपस्थित केले होते. या रस्त्यावरील संरक्षक कठडे जीर्ण व दुरवस्थेत असून काही ठिकाणी कठडे पडलेले असल्याचे माहे जानेवारी, 2022 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, सदर रस्त्यालगतच्या एका बाजूला दरी व दुसर्या बाजूला डोंगर असल्यामुळे वाहनांने ये-जा करणार्या प्रवाशांसह येथे येणार्या पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण करून बांधणे तसेच डोंगरातून दरड पडू नये याकरीता आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणेबाबत राजपूरी ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे.या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने डोंगरी ते राजपूरी या रस्त्यावरील संरक्षक कठडा व संरक्षक मित बांधण्याबाबत कोणती कार्यवाही केली अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मंत्री अशोक चव्हाण यांनी त्याच्या लांबीत मंजूर दुरुस्तीचे काम प्रगतीत असून, य कामात समाविष्ट संरक्षक भिंती बांधण्याचे काम जून, 2022 पर्यंत पू करण्याचे नियोजन आहे, असे स्पष्ट केले.
चिंचवली तर्फे आतोणे सरपंच पदाची निवडणूक घ्या
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली तर्फे आतोणे येथील सरपंच पदाची निवडणूक घेणे बंधनकारक असतानाही अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे सदरचे पद हे रिक्त असून सदरची सरपंच पदाची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, यासाठी शे.का.पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे मागणी केली. मंजुळा दिपक काटकर यांना थेट सरपंच म्हणून राहाण्यास मा. अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या आदेशान्वये अपात्र अनर्ह ठरविण्यात आले असल्याने सरपंच हे पद रिक्त झाले आहे. असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.