बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन ! खा. विनायक राऊत यांना अटक

। राजापूर । प्रतिनिधी ।

कोकणातल्या राजापूर येथील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने मोडून काढला. तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version