नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान चिनी सैनिकांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना मंगळवारी मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो-लेपर्ड दरम्यान चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या अन्य पाच जवानांनाही वीर चक्र प्रदान करण्यात आले. ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये सहभागी असलेले नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार तेजेंद्र सिंह, हवालदार के पिलानी, नाईक दीपक सिंग आणि शिपाई गुरतेज सिंग यांनाही त्यांच्या शौर्य आणि पराक्रमी कारवाईसाठी वीर चक्र प्रदान करण्यात आले.