छाटणी केलेल्या फांद्या धोकादायक

। उरण । प्रतिनिधी ।

महावितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे करताना दरवर्षी धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येते. मात्र, छाटणी करण्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या या ठिकठिकाणी झाडांवर लोंबकळत ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसात छाटणी करण्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या या नागरिकांच्या अंगावर पडून दुर्घटना घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरण कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून छाटणी करण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरु शकतात, अशी भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

काही वर्षांपासून उरण तालुक्यातील काही ठिकाणच्या वृक्ष छाटणीच्या कामांना विलंब झाल्याने अनेक झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या दुर्घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वारंवार झाडे कोसळून नुकसान झाले आहे. यंदाही याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जून महिना सुरू होण्याआधी तालुक्यातील धोकादायक आणि मोठ्या झाडांच्या छाटणीची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सामाजिक संघटनांकडून केली आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील अनेक ठिकाणच्या धोकादायक ठरू पाहणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकण्याच्या कामांना जून महिन्याच्या अगोदरच सुरुवात झाली आहे. मात्र, छाटणी करण्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या या ठिकठिकाणी झाडांवर लोंबकळत ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसात छाटणी करण्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या या नागरिकांच्या अंगावर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरण कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून छाटणी करण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या या जिवघेण्या ठरु शकतात अशी भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

Exit mobile version