। कळंबोली । प्रतिनिधी ।
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त कळंबोली अग्निशमन केंद्राच्यावतीने जनजागृती अभियान व अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात होते. हा कार्यक्रम गरूवारी (दि.16) कळंबोली येथील सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाची कार्यपद्धती, अत्यावश्यक संपर्क क्रमांक तसेच आग प्रतिबंधक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अग्निशमन साहित्य व वाहनांचीही ओळख करून देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आग विझवण्याचे विविध प्रकार दाखवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. कार्यक्रमास उप अग्नि अधिकारी मनिष ब्राह्मणकर, फत्तेसिंग गायकवाड, यंत्रचालक चैतन्य झांजले, मोहनिल ओंकार तसेच अग्निशामक संकेत शिंदे व संतोष जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.







